पोस्ट्स

Welcome to Megha's Recipes!

नमस्कार मैत्रिणींनो मी मेघा महेश अजनाडकर.लग्ना आधीची स्मिता सदाशिव वाणी. माझ्या Megha's Recipe आपले स्वागत. मी आपल्यासमोर ज्या रेसिपी घेऊन येणार आहे त्या संपूर्ण व्हेज रेसिपी आहेत.या रेसिपी ना बऱ्यापैकी खान्देशी टच आहे.कारण माझी आई खान्देशची.आई एक उत्तम सुगरण आहे.नंतर ती मराठवाड्यात स्थायिक झाली त्यामुळे तिकडील पदार्थ सुद्धा शेअर करत आहे. तिच्याकडून माझ्याकडे आलेली पदार्थाची आवड आणि आता मुले मोठी झाल्याने मिळालेली सवड त्याचा उपयोग. माझ्या या ब्लॉग  मध्ये पारंपरिक,पौष्टीक आणि सोप्या पाककृती मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्यापर्यंत घेऊन येत आहे.एवढेच नाही तर नवीन रेसिपी, ओव्हन रेसिपी, ज्युस,पापड, नाष्टा रेसिपी ,चाट,लोणची यासोबत मी आपल्याला भेटत राहीन.

पौष्टीक सोया पनीर बॉल्स(Healthy Soya -Paneer Balls)

इमेज
  साहित्य : --1+1/2  वाटी सोया chunks --1/4  वाटी पनीर --2  उकडलेले बटाटे --5/6 ब्रेड स्लाइस --ब्रेड crums --4-5  हिरव्या मिरच्या --2  चमचे लाल तिखट --1 चमचा हळद --1 चमचा गरम मसाला --2 चमचे निंबु रस --कोथिंबीर --चवीपुरते मीठ --तेल --फोडणीसाठी:मोहरी आणि जिरे कृती : Watch on YouTube https://youtu.be/c0gGa7LJhNs प्रथम सोया chunks  पाणी घालून 5 ते 7  मिनिट उकळून घ्या. सोया थंड झाल्यावर प्रेस करून त्यातील सर्व पाणी काढून टाका. नंतर सोया मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता उकडलेले बटाटे सोलून चमच्याने ठेचून घ्या. नंतर बटाटे,वाटलेले सोया,पनीर,मिरचीचे बारीक काप,तिखट,हळद,गरम मसाला, निंबू रस,कोथिंबीर व चवीपुरते मीठ घालून छान मिक्स करून घ्या. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी व जिरे घालून फोडणी करा व त्यात वरील केलेले मिश्रण घालून छान 3-4 मिनिट परतवून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे बॉल्स करून घ्या. आता तळण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा. आता 1 ब्रेडची स्लाइस घेऊन ती सावकाश पाण्यात बुडवा व नंतर दाबून त्यातील पाणी काढून टाका म्हणजे स्लाइस  थोडी मऊ करून घ्या. स्लाइस वर सोया पनीर चा ,बॉल ठेवून ...

कैरीची भाजी(Kairy Bhaji)Green Mango Curry

इमेज
कैरीची भाजी(Kairy Bhaji)Green Mango Curry साहित्य (Ingredients) 1 मोठी कैरी (1 Green Mango) 1/2(अर्धी) वाटी गूळ (1/2 bowl jaggery) 1 चमचा मोहरी ( 1 table spoon mustard) 1 चमचा जिरे (1 table spoon cumin seeds) 1 चमचा धने पावडर(1 table spoon coriander powder) 1 चमचा मेथी दाणे(1 table spoon fenugreek) 3-4 चमचे तिखट (3-4 table spoon pungent) 1/2 चमचा हळद (1/2 table spoon turmeric) 1 चमचा गरम मसाला (1 table spoon spice) 1 चमचा हिंग ( 1 table spoon hinga) 1 चमचा आलं पेस्ट (1 table spoon Ginger paste) 3-4 चमचे तेल (3-4 table spoon oil) चवीपुरते मीठ (salt as per test) कृती : Also watch on YouTube प्रथम कैरीची साल काढून त्याचे तुकडे करून घ्या. नंतर कढईत तेल तापवून त्यात मोहरी, जिरे ,हळद ,तिखट ,गरम मसाला, हिंग आलं मेथी दाणे घालून नंतर कैरीच्या फोडी घालून परतवून घ्या. 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून मध्यम आचेवर वाफ येऊ द्यावी.मध्ये एकदा हलवून घ्यावे. भाजी छान शिजली की त्यात मीठ व गूळ घालून छान मिक्स करावे. भाजी शिजल्यावर च मीठ आणि गूळ घालावे नाहीतर भाजी लवकर शिजत नाही. ही भाजी फ्रीज मध्ये वर्ष भर टिकते.

राजगिरा शिरा(Rajgira Shira) उपवासासाठी

इमेज
राजगिरा शिरा साहित्य : 1/2 (अर्धी) वाटी राजगिरा पीठ, (राजगिरा पीठ विकत मिळते किंवा राजगिरा भाजून मिक्सरमधून फिरवून घ्या.) 1/4 (पाव) वाटी साखर, 1/4 (पाव) वाटी साजूक तूप, 2 वाट्या दूध, ड्राय फ्रूट (बदाम,काजू ) कृती : Also view on YouTube पॅनमध्ये राजगिरा पीठ आणि तूप टाकून मंद गॅसवर एक मिनिट भाजून घ्या. राजगिरा भाजून पीठ केलेले असल्याने जास्त भाज्यांची गरज नाही. दूध गरम करून त्यात घाला. दूध पिठात आटले की साखर घाला. 2/3 मिनिट मिक्स करून गॅस बंद करा. बदाम,काजूचे काप घालून उपवासाचा तयार शिरा सर्व्ह करा. टीप : राजगिरा मद्ये कॅल्शिअम आणि इतर जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.

कणकेचा शिरा(kankecha shira)

इमेज
कणकेचा शिरा साहित्य : 1 वाटी जाड (बट्टी साठी वापरतो ती) कणीक, 1/2 (अर्धी) वाटी साजूक गायीचे तूप, 2 वाट्या दूध, 1/2 वाटी साखर,  ड्राय फ्रूटस (बदाम,काजू,किसमिस). कृती : प्रथम पॅनमध्ये कणीक भाजायला घ्या. एकीकडे भांड्यात दूध तापत ठेवा. कणीक छान गुलाबी रंगावर भाजून घ्या. कणीक भाजताना गॅस स्लो ठेवा नाहीतर कणीक जळण्याची शक्यता असते. नंतर तूप टाकून पुन्हा थोडे परतवा.( रवा किंवा कणीक भाजताना सुरवातीलाच तूप टाकल्यास भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो.) नंतर त्यात गरम दूध टाकून मिक्स करून घ्या. दूध आटले की साखर घालून 4-5 मिनिट छान मिक्स करून गॅस बंद करा. ड्राय फ्रूट घालून गरम गरम सर्व करा कणकेचा शिरा.खूप मऊ होतो आणि छान लागतो. टीप : वेलदोडे चव आवडत असल्यास थोडी विलायची पावडर वापरावी. मला व माझ्या मुलीला वेलदोड्याची चव शिरा मध्ये आवडत नाही म्हणून मी वापरत नाही.  

फोडणीची पोळी(Fodnichi Poli)

इमेज
फोडणीची पोळी साहित्य : 3-4 उरलेल्या पोळ्या, 1 मोठा कांदा, थोडेसे शेंगदाणे, 3-4 हिरवी मिरची, 1 चमचा साखर, 1/2 (अर्धा) निम्बु, 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट, फोडणीसाठी मोहरी,जिरे, मीठ, तेल, कोथिंबिर कृती : प्रथम पोळीचे तुकडे करून घ्यावेत. नंतर मिक्सरमधून बारीक करून घ्या.थोडे जाडसरच ठेवा. नंतर कढई मध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्या. शेंगदाणे,मोहरी,जिरे,हिरव्या मिरचीचे तुकडे ,बारीक चिरलेला कांदा घाला.  कांदा गुलाबसर होऊ द्या. बारीक केलेल्या पोळीत तिखट,हळद,साखर, चवीपुरते मीठ व कोथिंबीर छान मिक्स करून घ्या. निम्बू रस घाला. हे सर्व आता कढईत घालून छान मिक्स करुन घ्या. गॅस स्लो करून झाकण ठेऊन द्या. 2-3 मिनिटांनी गॅस बंद करून एक वेगळा नाष्टा म्हणून सर्व करा फोडणीची पोळी.

इडली-सांबार (Idli-Sambar)

इमेज
ही साऊथ इंडियन डिश असली तरी सगळीकडे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. इडली-सांबार (Idli-Sambar) इडली साहित्य : 1 वाटी उडदाची डाळ , 3 वाट्या उकडे तांदूळ (साधे असल्यास                                2 वाटी), मीठ. 7-8 मेथी दाणे, तेल. सांबार साहित्य : 1/2 (अर्धी) वाटी तूरडाळ, 1/4 (पाव वाटी) मुगडाळ, 1 मध्यम कांदा, 1 बटाटा, 1 लहानसा लाल भोपळ्याचा तुकडा, 1 वांगे, 1 टोमॅटो, 1 शेवग्याची शेंग, 8-10 लसूण पाकळ्या, 1 मोहरी, 2 चमचे जिरे, 2 चमचे तिखट, 1 चमचा हळद, 2 मोठे चमचे सांबार मसाला, मीठ, कोथिंबीर, तेल. कढीपत्ता. थोडा चिंचेचा कोळ, थोडा गूळ(आवडीप्रमाणे). इडली कृती: उडदाची डाळ व तांदूळ आदल्या रात्री वेगवेगळे भिजत घाला. सकाळी मिक्सवर थोडे जाडसर(रव्यासारखे) वेगवेगळे वाटून घ्या. नंतर दोन्ही एकत्र करून,त्यात मीठ घालून चांगले ढवळून मोठ्या भांड्यात टाकून त्यात 7-8 मेथी दाणे घालून झाकून ठेवावे. दुपारपर्यंत पीठ चांगले फुगून येईल. नंतर इडली पत्रातील वत्याना  तेल लावून त्यात वरील मिश्रण 1/1 चमचा घालून 15 मिनिटांसाठी इडल्या वाफून घ्याव्या. सोडा नाही घातला तरी चालतो. सांबार कृती : प्रथम डा...

शेवगा रस्सा(Shevga Rassa)

इमेज
शेवगा रस्सा(Shevga Rassa) साहित्य : 3/4 शेवग्याच्या शेंगा, 1 मोठा कांदा, 7_8 सुके खोबरे काप, 4_5 चमचे धने(पोहे खाण्याचा चमचा), 2 चमचे जिरे, 1 चमचा(पोह्याचा) खसखस, 5-6 लसूण पाकळ्या, 4-5 लाल सुक्या मिरच्या, 1/4 चमचा बडीशोप, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, मीठ, तेल कृती: प्रथम शेवग्याच्या शेंगा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.नंतर एका शेंगांचे 4_5 असे सर्व शेंगांचे तुकडे करून घ्या. कुकरमध्ये एक शिटी काढून शिजवून घ्या. पॅनमध्ये थोडे तेल टाकून तेल तापले की त्यात   कांदा,खोबरे,खसखस,धने,जिरे,बडीशोप,मिरच्या एक एक करून लालसर भाजून घ्या.नंतर हे सर्व एकत्र करा त्यात लसूण टाकून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून तेल तापले की मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात वाटलेला मसाला घालून छान परतवून घ्या.नंतर त्यात हळद आणि गरम मसाला घाला.नंतर त्यात एक शिटी काढून शिजवून घेतलेल्या शेंगा घाला.गरम पाणी घालून हवी तशी सरसरी करून घ्या. चवीपुरते मीठ घालून पोळी किंवा भाकरीबरोबर गरम सर्व करा शेवगा रस्सा.

आलू पराठा ( Aalu Paratha)

इमेज
आलू पराठा ( Aalu Paratha) साहित्य: पराठा कव्हर साठी भिजवलेली   कणीक कणीक थोडी सैलसर भिजवावी. पुरणपोळी साठी भिजवतो तशी.    सारण: 4-5 मोठे बटाटे, 5-6 लसूण पाकळ्या, 1/2 (अर्धा) इंच आलं, 4-5 कढी पत्ता, 1/2 (अर्धा नींबु), 1 पोहे खाण्याचा चमचा गरम मसाला, 2 चमचे तिखट (मसाला डब्यातील चमचा), 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे किंवा जिरे पावडर, 2 चमचे पावभाजी मसाला, अर्धी वाटी कापलेली कोथिंबीर, मीठ, तेल, तूप कृती : प्रथम कुकरमध्ये बटाटे उकळून घ्या.थंड झाले की सोलून त्याचे अगदी बारीक बारीक तुकडे करून घ्या.तुकडे मोठे राहिल्यास पराठा तुटण्याची शक्यता वाढते. नंतर पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून ते तापले की मोहरी टाका मोहरी तडतडली की आले, लसूण व कढी पत्ता याची पेस्ट करून त्यात टाका.नंतर धने जिरे पावडर,हळद,तिखट, गरम मसाला, पावभाजी मसाला घालून बटाट्याचे जे बारीक तुकडे केले आहेत ते घाला त्यात नींबू पिळून चवीपुरते मीठ घाला.भाजी छान परतवून घ्या.कोथिंबीर घाला व भाजी गॅस वरून काढून गार होऊ द्या. भिजवलेल्या कणकेचा छोटा गोळा घेऊन त्यात पुरण भरतो तसे बटाट्याच्या भाजीचे सारण भरून बाजू बंद करून घ्या.पोळप...

मिरचीचे लोणचे ( Mirchiche Lonche)

इमेज
साहित्य : 100 gm.(20_25) हिरव्या फिक्या मिरच्या , 4_5 निबूं, 2_3 इंच आलं, 2 चमचे (पोहे खाण्याचा) मोहरी डाळ, मीठ, तेल मिरचीचे लोणचे ( Mirchiche Lonche) कृती: मिरच्या मिठाच्या पाण्याने स्वच्छ धऊन घ्या. नंतर त्याचे बारीक तुकडे करून घ्या.  आलं स्वच्छ धुऊन किसून घ्या. मिरचीचे तुकडे व आलं किस एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घाला नंतर त्यात निंबु पिळून घ्या. 2_3 मोठे चमचे तेल तापत ठेवा. तेल तापले की गॅस बंद करून त्यात मोहरीची डाळ घाला.  तेल थंड झाल्यावर वरील मिश्रणात कालवून बरणीत भरून घ्या . तेलाचे लेअर मिश्रणाच्या थोडेसे वरती ठेवा जेणेकरून लोणचे खराब होणार नाही. 2_3 दिवसात हे लोणचे खाण्यास तयार.15_20 दिवस सहज टिकते. मिरचीचे लोणचे ( Mirchiche Lonche)