Welcome to Megha's Recipes!

नमस्कार मैत्रिणींनो मी मेघा महेश अजनाडकर.लग्ना आधीची स्मिता सदाशिव वाणी. माझ्या Megha's Recipe आपले स्वागत. मी आपल्यासमोर ज्या रेसिपी घेऊन येणार आहे त्या संपूर्ण व्हेज रेसिपी आहेत.या रेसिपी ना बऱ्यापैकी खान्देशी टच आहे.कारण माझी आई खान्देशची.आई एक उत्तम सुगरण आहे.नंतर ती मराठवाड्यात स्थायिक झाली त्यामुळे तिकडील पदार्थ सुद्धा शेअर करत आहे. तिच्याकडून माझ्याकडे आलेली पदार्थाची आवड आणि आता मुले मोठी झाल्याने मिळालेली सवड त्याचा उपयोग. माझ्या या ब्लॉग  मध्ये पारंपरिक,पौष्टीक आणि सोप्या पाककृती मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्यापर्यंत घेऊन येत आहे.एवढेच नाही तर नवीन रेसिपी, ओव्हन रेसिपी, ज्युस,पापड, नाष्टा रेसिपी ,चाट,लोणची यासोबत मी आपल्याला भेटत राहीन.

राजगिरा शिरा(Rajgira Shira) उपवासासाठी


राजगिरा शिरा
राजगिरा शिरा

साहित्य :


  • 1/2 (अर्धी) वाटी राजगिरा पीठ, (राजगिरा पीठ विकत मिळते किंवा राजगिरा भाजून मिक्सरमधून फिरवून घ्या.)
  • 1/4 (पाव) वाटी साखर,
  • 1/4 (पाव) वाटी साजूक तूप,
  • 2 वाट्या दूध,
  • ड्राय फ्रूट (बदाम,काजू )

कृती :
  1. पॅनमध्ये राजगिरा पीठ आणि तूप टाकून मंद गॅसवर एक मिनिट भाजून घ्या.
  2. राजगिरा भाजून पीठ केलेले असल्याने जास्त भाज्यांची गरज नाही.
  3. दूध गरम करून त्यात घाला.
  4. दूध पिठात आटले की साखर घाला.
  5. 2/3 मिनिट मिक्स करून गॅस बंद करा.
  6. बदाम,काजूचे काप घालून उपवासाचा तयार शिरा सर्व्ह करा.

टीप : राजगिरा मद्ये कॅल्शिअम आणि इतर
जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुगाच्या डाळीची भाजी(Mugachya Dalichi Bhaji)

मिसळीचे वरण(Misaliche Varan)

आंबट चुक्याची भाजी(Chukyachi Bhaji)