Welcome to Megha's Recipes!

नमस्कार मैत्रिणींनो मी मेघा महेश अजनाडकर.लग्ना आधीची स्मिता सदाशिव वाणी. माझ्या Megha's Recipe आपले स्वागत. मी आपल्यासमोर ज्या रेसिपी घेऊन येणार आहे त्या संपूर्ण व्हेज रेसिपी आहेत.या रेसिपी ना बऱ्यापैकी खान्देशी टच आहे.कारण माझी आई खान्देशची.आई एक उत्तम सुगरण आहे.नंतर ती मराठवाड्यात स्थायिक झाली त्यामुळे तिकडील पदार्थ सुद्धा शेअर करत आहे. तिच्याकडून माझ्याकडे आलेली पदार्थाची आवड आणि आता मुले मोठी झाल्याने मिळालेली सवड त्याचा उपयोग. माझ्या या ब्लॉग  मध्ये पारंपरिक,पौष्टीक आणि सोप्या पाककृती मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्यापर्यंत घेऊन येत आहे.एवढेच नाही तर नवीन रेसिपी, ओव्हन रेसिपी, ज्युस,पापड, नाष्टा रेसिपी ,चाट,लोणची यासोबत मी आपल्याला भेटत राहीन.

मिसळीचे वरण(Misaliche Varan)

साहित्य

माप (पोहे खाण्याचा चमचा)
2-3 चमचे चना डाळ
2-3 चमचे तूरडाळ
2-3 चमचे मुगडाळ
2-3 चमचे सालाची उडिद डाळ
2-3 चमचे चवळी डाळ
2-3 चमचे तांदूळ
1 (एक चमचा) आमचूर पावडर
7- 8 लसूण पाकळ्या
1/2 इंच आलं
मोहरी
जिरे
तिखट
हळद
मीठ
तेल
कोथिंबीर

कृती

प्रथम सर्व डाळी,तांदूळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्या.नंतर एक ते दीड वाटी पाणी घालून कुकरमद्ये छान शिजवून घ्या. नंतर वरण घोटून घ्या. गरज असल्यास थोडे गरम पाणी घालून सरसरे करून घ्या. गॅसवर छोट्या कढईत तेल घालून त्यात मोहरी,जिरे,लसूण आलं पेस्ट,तिखट,हळद घालून फोडणी करून वरणात वरून टाका . नंतर चवीपुरते मीठ व आमचूर पावडर घालून एक उकळी येऊ दया. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.हे वरण ज्वारीची भाकरी किंवा भात याबरोबर छान लागते.जास्त तिखट आणि आंबट चव छान लागते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुगाच्या डाळीची भाजी(Mugachya Dalichi Bhaji)

आंबट चुक्याची भाजी(Chukyachi Bhaji)