ही साऊथ इंडियन डिश असली तरी सगळीकडे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात.
|
इडली-सांबार (Idli-Sambar) |
इडली साहित्य :
- 1 वाटी उडदाची डाळ ,
- 3 वाट्या उकडे तांदूळ (साधे असल्यास 2 वाटी),
- मीठ.
- 7-8 मेथी दाणे,
- तेल.
सांबार साहित्य :
- 1/2 (अर्धी) वाटी तूरडाळ,
- 1/4 (पाव वाटी) मुगडाळ,
- 1 मध्यम कांदा,
- 1 बटाटा,
- 1 लहानसा लाल भोपळ्याचा तुकडा,
- 1 वांगे,
- 1 टोमॅटो,
- 1 शेवग्याची शेंग,
- 8-10 लसूण पाकळ्या,
- 1 मोहरी,
- 2 चमचे जिरे,
- 2 चमचे तिखट,
- 1 चमचा हळद,
- 2 मोठे चमचे सांबार मसाला,
- मीठ,
- कोथिंबीर,
- तेल.
- कढीपत्ता.
- थोडा चिंचेचा कोळ,
- थोडा गूळ(आवडीप्रमाणे).
इडली कृती:
- उडदाची डाळ व तांदूळ आदल्या रात्री वेगवेगळे भिजत घाला.
- सकाळी मिक्सवर थोडे जाडसर(रव्यासारखे) वेगवेगळे वाटून घ्या.
- नंतर दोन्ही एकत्र करून,त्यात मीठ घालून चांगले ढवळून मोठ्या भांड्यात टाकून त्यात 7-8 मेथी दाणे घालून झाकून ठेवावे.
- दुपारपर्यंत पीठ चांगले फुगून येईल.
- नंतर इडली पत्रातील वत्याना तेल लावून त्यात वरील मिश्रण 1/1 चमचा घालून 15 मिनिटांसाठी इडल्या वाफून घ्याव्या.
- सोडा नाही घातला तरी चालतो.
सांबार कृती :
- प्रथम डाळी व सर्व भाज्या मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.
- आता कुकरमध्ये डाळ,सर्व भाज्या, चिरलेला कांदा,लसूण सर्व घालून आवश्यक पाणी घालून दोन शिट्ट्या काढून घ्या.
- थंड झाल्यावर चमच्याने घोटून घ्या. पाणी घालून हवे तसे पातळ करून घ्या.
- चवीपुरते मीठ घाला.गूळ आणि चिंचेचा कोळ घाला.
- छोट्या कढईत मोठे 2 चमचे तेल टाकून मोहरी घाला.
- मोहरी ,जिरे,हळद,तिखट सांबार मसाला,कढीपत्ता ,2 सुक्या मिरच्या घालून फोडणी करा.
- सरसरीत केलेल्या सांबार ला झणझणीत तडका द्या.
- वरून कोथिंबीर घालून नारळाच्या चटणीबरोबर गरम गरम इडली सांबार सर्व करा.
|
सांबार |
टीप : कांदा,लसूण फोडणीत टाकण्यापेक्षा वरण शिजताना त्यात कच्चे टाकल्यास एक छान चव येते.
इडली पीठ पातळ झाल्यास त्यात थोडे पोहे वाटून टाकावे.
ही रेसिपी मी लॉकडाऊन् मध्ये केलेली असल्याने माझ्याकडील available भाज्या वापरल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा