Welcome to Megha's Recipes!

नमस्कार मैत्रिणींनो मी मेघा महेश अजनाडकर.लग्ना आधीची स्मिता सदाशिव वाणी. माझ्या Megha's Recipe आपले स्वागत. मी आपल्यासमोर ज्या रेसिपी घेऊन येणार आहे त्या संपूर्ण व्हेज रेसिपी आहेत.या रेसिपी ना बऱ्यापैकी खान्देशी टच आहे.कारण माझी आई खान्देशची.आई एक उत्तम सुगरण आहे.नंतर ती मराठवाड्यात स्थायिक झाली त्यामुळे तिकडील पदार्थ सुद्धा शेअर करत आहे. तिच्याकडून माझ्याकडे आलेली पदार्थाची आवड आणि आता मुले मोठी झाल्याने मिळालेली सवड त्याचा उपयोग. माझ्या या ब्लॉग  मध्ये पारंपरिक,पौष्टीक आणि सोप्या पाककृती मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्यापर्यंत घेऊन येत आहे.एवढेच नाही तर नवीन रेसिपी, ओव्हन रेसिपी, ज्युस,पापड, नाष्टा रेसिपी ,चाट,लोणची यासोबत मी आपल्याला भेटत राहीन.

मिरचीचे लोणचे ( Mirchiche Lonche)

साहित्य :
  • 100 gm.(20_25) हिरव्या फिक्या मिरच्या ,
  • 4_5 निबूं,
  • 2_3 इंच आलं,
  • 2 चमचे (पोहे खाण्याचा) मोहरी डाळ,
  • मीठ,
  • तेल


मिरचीचे लोणचे ( Mirchiche Lonche)
मिरचीचे लोणचे ( Mirchiche Lonche)

कृती:
  1. मिरच्या मिठाच्या पाण्याने स्वच्छ धऊन घ्या.
  2. नंतर त्याचे बारीक तुकडे करून घ्या.
  3.  आलं स्वच्छ धुऊन किसून घ्या.
  4. मिरचीचे तुकडे व आलं किस एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घाला नंतर त्यात निंबु पिळून घ्या.
  5. 2_3 मोठे चमचे तेल तापत ठेवा.
  6. तेल तापले की गॅस बंद करून त्यात मोहरीची डाळ घाला.
  7.  तेल थंड झाल्यावर वरील मिश्रणात कालवून बरणीत भरून घ्या .
  8. तेलाचे लेअर मिश्रणाच्या थोडेसे वरती ठेवा जेणेकरून लोणचे खराब होणार नाही.
  9. 2_3 दिवसात हे लोणचे खाण्यास तयार.15_20 दिवस सहज टिकते.

मिरचीचे लोणचे ( Mirchiche Lonche)
मिरचीचे लोणचे ( Mirchiche Lonche)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुगाच्या डाळीची भाजी(Mugachya Dalichi Bhaji)

मिसळीचे वरण(Misaliche Varan)

आंबट चुक्याची भाजी(Chukyachi Bhaji)