Welcome to Megha's Recipes!

नमस्कार मैत्रिणींनो मी मेघा महेश अजनाडकर.लग्ना आधीची स्मिता सदाशिव वाणी. माझ्या Megha's Recipe आपले स्वागत. मी आपल्यासमोर ज्या रेसिपी घेऊन येणार आहे त्या संपूर्ण व्हेज रेसिपी आहेत.या रेसिपी ना बऱ्यापैकी खान्देशी टच आहे.कारण माझी आई खान्देशची.आई एक उत्तम सुगरण आहे.नंतर ती मराठवाड्यात स्थायिक झाली त्यामुळे तिकडील पदार्थ सुद्धा शेअर करत आहे. तिच्याकडून माझ्याकडे आलेली पदार्थाची आवड आणि आता मुले मोठी झाल्याने मिळालेली सवड त्याचा उपयोग. माझ्या या ब्लॉग  मध्ये पारंपरिक,पौष्टीक आणि सोप्या पाककृती मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्यापर्यंत घेऊन येत आहे.एवढेच नाही तर नवीन रेसिपी, ओव्हन रेसिपी, ज्युस,पापड, नाष्टा रेसिपी ,चाट,लोणची यासोबत मी आपल्याला भेटत राहीन.

कणकेचा शिरा(kankecha shira)


कणकेचा शिरा
कणकेचा शिरा

साहित्य :


  • 1 वाटी जाड (बट्टी साठी वापरतो ती) कणीक,
  • 1/2 (अर्धी) वाटी साजूक गायीचे तूप,
  • 2 वाट्या दूध,
  • 1/2 वाटी साखर, 
  • ड्राय फ्रूटस (बदाम,काजू,किसमिस).

कृती :





  1. प्रथम पॅनमध्ये कणीक भाजायला घ्या.
  2. एकीकडे भांड्यात दूध तापत ठेवा.
  3. कणीक छान गुलाबी रंगावर भाजून घ्या.
  4. कणीक भाजताना गॅस स्लो ठेवा नाहीतर कणीक जळण्याची शक्यता असते.
  5. नंतर तूप टाकून पुन्हा थोडे परतवा.( रवा किंवा कणीक भाजताना सुरवातीलाच तूप टाकल्यास भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो.)
  6. नंतर त्यात गरम दूध टाकून मिक्स करून घ्या.
  7. दूध आटले की साखर घालून 4-5 मिनिट छान मिक्स करून गॅस बंद करा.
  8. ड्राय फ्रूट घालून गरम गरम सर्व करा कणकेचा शिरा.खूप मऊ होतो आणि छान लागतो.

टीप : वेलदोडे चव आवडत असल्यास थोडी विलायची पावडर वापरावी.
मला व माझ्या मुलीला वेलदोड्याची चव शिरा मध्ये आवडत नाही म्हणून मी वापरत नाही.


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुगाच्या डाळीची भाजी(Mugachya Dalichi Bhaji)

मिसळीचे वरण(Misaliche Varan)

आंबट चुक्याची भाजी(Chukyachi Bhaji)