Welcome to Megha's Recipes!

नमस्कार मैत्रिणींनो मी मेघा महेश अजनाडकर.लग्ना आधीची स्मिता सदाशिव वाणी. माझ्या Megha's Recipe आपले स्वागत. मी आपल्यासमोर ज्या रेसिपी घेऊन येणार आहे त्या संपूर्ण व्हेज रेसिपी आहेत.या रेसिपी ना बऱ्यापैकी खान्देशी टच आहे.कारण माझी आई खान्देशची.आई एक उत्तम सुगरण आहे.नंतर ती मराठवाड्यात स्थायिक झाली त्यामुळे तिकडील पदार्थ सुद्धा शेअर करत आहे. तिच्याकडून माझ्याकडे आलेली पदार्थाची आवड आणि आता मुले मोठी झाल्याने मिळालेली सवड त्याचा उपयोग. माझ्या या ब्लॉग  मध्ये पारंपरिक,पौष्टीक आणि सोप्या पाककृती मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्यापर्यंत घेऊन येत आहे.एवढेच नाही तर नवीन रेसिपी, ओव्हन रेसिपी, ज्युस,पापड, नाष्टा रेसिपी ,चाट,लोणची यासोबत मी आपल्याला भेटत राहीन.

पौष्टीक सोया पनीर बॉल्स(Healthy Soya -Paneer Balls)

 

साहित्य :

--1+1/2  वाटी सोया chunks
--1/4  वाटी पनीर
--2  उकडलेले बटाटे
--5/6 ब्रेड स्लाइस
--ब्रेड crums
--4-5  हिरव्या मिरच्या
--2  चमचे लाल तिखट
--1 चमचा हळद
--1 चमचा गरम मसाला
--2 चमचे निंबु रस
--कोथिंबीर
--चवीपुरते मीठ
--तेल
--फोडणीसाठी:मोहरी आणि जिरे

कृती :

Watch on YouTube
https://youtu.be/c0gGa7LJhNs
  1. प्रथम सोया chunks  पाणी घालून 5 ते 7  मिनिट उकळून घ्या.
  2. सोया थंड झाल्यावर प्रेस करून त्यातील सर्व पाणी काढून टाका.
  3. नंतर सोया मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  4. आता उकडलेले बटाटे सोलून चमच्याने ठेचून घ्या.
  5. नंतर बटाटे,वाटलेले सोया,पनीर,मिरचीचे बारीक काप,तिखट,हळद,गरम मसाला, निंबू रस,कोथिंबीर व चवीपुरते मीठ घालून छान मिक्स करून घ्या.
  6. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी व जिरे घालून फोडणी करा व त्यात वरील केलेले मिश्रण घालून छान 3-4 मिनिट परतवून घ्या.
  7. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे बॉल्स करून घ्या.
  8. आता तळण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा.
  9. आता 1 ब्रेडची स्लाइस घेऊन ती सावकाश पाण्यात बुडवा व नंतर दाबून त्यातील पाणी काढून टाका म्हणजे स्लाइस  थोडी मऊ करून घ्या.
  10. स्लाइस वर सोया पनीर चा ,बॉल ठेवून सर्व बाजूंनी ब्रेड स्लाइस ने बॉल पॅक करून घ्या.
  11. ब्रेड crums मध्ये घोळवून डार्क गोल्डन रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.
  12. अशाप्रकारे सर्व बॉल्स बनवून घ्या व चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
हे सोया पनीर बॉल्स खूप चविष्ट लागतात चटणी किंवा  सॉस शिवाय सुद्धा खाऊ शकता.







--
--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुगाच्या डाळीची भाजी(Mugachya Dalichi Bhaji)

मिसळीचे वरण(Misaliche Varan)

आंबट चुक्याची भाजी(Chukyachi Bhaji)