Welcome to Megha's Recipes!

नमस्कार मैत्रिणींनो मी मेघा महेश अजनाडकर.लग्ना आधीची स्मिता सदाशिव वाणी. माझ्या Megha's Recipe आपले स्वागत. मी आपल्यासमोर ज्या रेसिपी घेऊन येणार आहे त्या संपूर्ण व्हेज रेसिपी आहेत.या रेसिपी ना बऱ्यापैकी खान्देशी टच आहे.कारण माझी आई खान्देशची.आई एक उत्तम सुगरण आहे.नंतर ती मराठवाड्यात स्थायिक झाली त्यामुळे तिकडील पदार्थ सुद्धा शेअर करत आहे. तिच्याकडून माझ्याकडे आलेली पदार्थाची आवड आणि आता मुले मोठी झाल्याने मिळालेली सवड त्याचा उपयोग. माझ्या या ब्लॉग  मध्ये पारंपरिक,पौष्टीक आणि सोप्या पाककृती मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्यापर्यंत घेऊन येत आहे.एवढेच नाही तर नवीन रेसिपी, ओव्हन रेसिपी, ज्युस,पापड, नाष्टा रेसिपी ,चाट,लोणची यासोबत मी आपल्याला भेटत राहीन.

फोडणीची पोळी(Fodnichi Poli)

फोडणीची पोळी
फोडणीची पोळी


साहित्य :


  • 3-4 उरलेल्या पोळ्या,
  • 1 मोठा कांदा,
  • थोडेसे शेंगदाणे,
  • 3-4 हिरवी मिरची,
  • 1 चमचा साखर,
  • 1/2 (अर्धा) निम्बु,
  • 1/2 चमचा हळद,
  • 1 चमचा तिखट,
  • फोडणीसाठी मोहरी,जिरे,
  • मीठ,
  • तेल,
  • कोथिंबिर

कृती :

  1. प्रथम पोळीचे तुकडे करून घ्यावेत.
  2. नंतर मिक्सरमधून बारीक करून घ्या.थोडे जाडसरच ठेवा.
  3. नंतर कढई मध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्या.
  4. शेंगदाणे,मोहरी,जिरे,हिरव्या मिरचीचे तुकडे ,बारीक चिरलेला कांदा घाला. 
  5. कांदा गुलाबसर होऊ द्या.
  6. बारीक केलेल्या पोळीत तिखट,हळद,साखर, चवीपुरते मीठ व कोथिंबीर छान मिक्स करून घ्या. निम्बू रस घाला.
  7. हे सर्व आता कढईत घालून छान मिक्स करुन घ्या.
  8. गॅस स्लो करून झाकण ठेऊन द्या.
  9. 2-3 मिनिटांनी गॅस बंद करून एक वेगळा नाष्टा म्हणून सर्व करा फोडणीची पोळी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुगाच्या डाळीची भाजी(Mugachya Dalichi Bhaji)

मिसळीचे वरण(Misaliche Varan)

आंबट चुक्याची भाजी(Chukyachi Bhaji)