Welcome to Megha's Recipes!

नमस्कार मैत्रिणींनो मी मेघा महेश अजनाडकर.लग्ना आधीची स्मिता सदाशिव वाणी. माझ्या Megha's Recipe आपले स्वागत. मी आपल्यासमोर ज्या रेसिपी घेऊन येणार आहे त्या संपूर्ण व्हेज रेसिपी आहेत.या रेसिपी ना बऱ्यापैकी खान्देशी टच आहे.कारण माझी आई खान्देशची.आई एक उत्तम सुगरण आहे.नंतर ती मराठवाड्यात स्थायिक झाली त्यामुळे तिकडील पदार्थ सुद्धा शेअर करत आहे. तिच्याकडून माझ्याकडे आलेली पदार्थाची आवड आणि आता मुले मोठी झाल्याने मिळालेली सवड त्याचा उपयोग. माझ्या या ब्लॉग  मध्ये पारंपरिक,पौष्टीक आणि सोप्या पाककृती मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्यापर्यंत घेऊन येत आहे.एवढेच नाही तर नवीन रेसिपी, ओव्हन रेसिपी, ज्युस,पापड, नाष्टा रेसिपी ,चाट,लोणची यासोबत मी आपल्याला भेटत राहीन.

कैरीची भाजी(Kairy Bhaji)Green Mango Curry


कैरीची भाजी(Kairy Bhaji)Green Mango Curry
कैरीची भाजी(Kairy Bhaji)Green Mango Curry

साहित्य (Ingredients)

  • 1 मोठी कैरी (1 Green Mango)
  • 1/2(अर्धी) वाटी गूळ (1/2 bowl jaggery)
  • 1 चमचा मोहरी ( 1 table spoon mustard)
  • 1 चमचा जिरे (1 table spoon cumin seeds)
  • 1 चमचा धने पावडर(1 table spoon coriander powder)
  • 1 चमचा मेथी दाणे(1 table spoon fenugreek)
  • 3-4 चमचे तिखट (3-4 table spoon pungent)
  • 1/2 चमचा हळद (1/2 table spoon turmeric)
  • 1 चमचा गरम मसाला (1 table spoon spice)
  • 1 चमचा हिंग ( 1 table spoon hinga)
  • 1 चमचा आलं पेस्ट (1 table spoon Ginger paste)
  • 3-4 चमचे तेल (3-4 table spoon oil)
  • चवीपुरते मीठ (salt as per test)
कृती :


  1. प्रथम कैरीची साल काढून त्याचे तुकडे करून घ्या.
  2. नंतर कढईत तेल तापवून त्यात मोहरी, जिरे ,हळद ,तिखट ,गरम मसाला, हिंग आलं मेथी दाणे घालून नंतर कैरीच्या फोडी घालून परतवून घ्या. 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून मध्यम आचेवर वाफ येऊ द्यावी.मध्ये एकदा हलवून घ्यावे.
  3. भाजी छान शिजली की त्यात मीठ व गूळ घालून छान मिक्स करावे.
  4. भाजी शिजल्यावर च मीठ आणि गूळ घालावे नाहीतर भाजी लवकर शिजत नाही.
  5. ही भाजी फ्रीज मध्ये वर्ष भर टिकते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुगाच्या डाळीची भाजी(Mugachya Dalichi Bhaji)

मिसळीचे वरण(Misaliche Varan)

आंबट चुक्याची भाजी(Chukyachi Bhaji)