Welcome to Megha's Recipes!

नमस्कार मैत्रिणींनो मी मेघा महेश अजनाडकर.लग्ना आधीची स्मिता सदाशिव वाणी. माझ्या Megha's Recipe आपले स्वागत. मी आपल्यासमोर ज्या रेसिपी घेऊन येणार आहे त्या संपूर्ण व्हेज रेसिपी आहेत.या रेसिपी ना बऱ्यापैकी खान्देशी टच आहे.कारण माझी आई खान्देशची.आई एक उत्तम सुगरण आहे.नंतर ती मराठवाड्यात स्थायिक झाली त्यामुळे तिकडील पदार्थ सुद्धा शेअर करत आहे. तिच्याकडून माझ्याकडे आलेली पदार्थाची आवड आणि आता मुले मोठी झाल्याने मिळालेली सवड त्याचा उपयोग. माझ्या या ब्लॉग  मध्ये पारंपरिक,पौष्टीक आणि सोप्या पाककृती मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्यापर्यंत घेऊन येत आहे.एवढेच नाही तर नवीन रेसिपी, ओव्हन रेसिपी, ज्युस,पापड, नाष्टा रेसिपी ,चाट,लोणची यासोबत मी आपल्याला भेटत राहीन.

शेवगा रस्सा(Shevga Rassa)


शेवगा रस्सा(Shevga Rassa)
शेवगा रस्सा(Shevga Rassa)
साहित्य :
  • 3/4 शेवग्याच्या शेंगा,
  • 1 मोठा कांदा,
  • 7_8 सुके खोबरे काप,
  • 4_5 चमचे धने(पोहे खाण्याचा चमचा),
  • 2 चमचे जिरे,
  • 1 चमचा(पोह्याचा) खसखस,
  • 5-6 लसूण पाकळ्या,
  • 4-5 लाल सुक्या मिरच्या,
  • 1/4 चमचा बडीशोप,
  • 1 चमचा गरम मसाला,
  • 1/2 चमचा हळद,
  • मीठ,
  • तेल

कृती:
  1. प्रथम शेवग्याच्या शेंगा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.नंतर एका शेंगांचे 4_5 असे सर्व शेंगांचे तुकडे करून घ्या. कुकरमध्ये एक शिटी काढून शिजवून घ्या.
  2. पॅनमध्ये थोडे तेल टाकून तेल तापले की त्यात 
  3.  कांदा,खोबरे,खसखस,धने,जिरे,बडीशोप,मिरच्या एक एक करून लालसर भाजून घ्या.नंतर हे सर्व एकत्र करा त्यात लसूण टाकून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
  4. पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून तेल तापले की मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात वाटलेला मसाला घालून छान परतवून घ्या.नंतर त्यात हळद आणि गरम मसाला घाला.नंतर त्यात एक शिटी काढून शिजवून घेतलेल्या शेंगा घाला.गरम पाणी घालून हवी तशी सरसरी करून घ्या.
  5. चवीपुरते मीठ घालून पोळी किंवा भाकरीबरोबर गरम सर्व करा शेवगा रस्सा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुगाच्या डाळीची भाजी(Mugachya Dalichi Bhaji)

मिसळीचे वरण(Misaliche Varan)

आंबट चुक्याची भाजी(Chukyachi Bhaji)